```php

अध्यक्षीय मनोगत

सकल गणेश भक्तांस,

सादर प्रमाण,

 

सार्वजनिक गणेशोत्सव सुभेदारवाडा कल्याण या वर्षी आपला १२४ वा गणेशोत्सव साजरा करीत आहे.

या गणेशोत्सवात सर्व गणेशभक्त व समस्त नागरिक यांचे मनापासून स्वागत.शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या गणेशोत्सवाचे १२३ व १२४ या वर्षांचे व्यवस्थापन दुर्वांकुर मंडळ करीत आहे.

लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून आरंभ झालेल्या 'सुभेदार वाडा' गणेशोत्सव ह कल्याण नगरीचा ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा आहे. हा गणेशोत्सव पारंपारिक व शिस्तबद्धतेने परंतु अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.

सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने व सहकार्याने हा आनंददायी प्रवास करताना नवनवीन विचारांची देवाण-घेवाण होऊन विविध गोष्टींचे आकलन होत असते. 'श्रीं'ची मूर्ती कल्पक सजावट,आणि अभ्यासपूर्ण मनोरंजनात्मक कार्यक्रम हे या गणेशोत्सवाचे आकर्षण आहे. या वर्षी सजावटीद्वारे पर्यावरणाचा संदेश घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत.

हा दिमाखदार उत्सव साजरा करण्यासाठी आपले सहकार्य असतेच आणि ते पुढेही असेल ह्यात शंका नाही. सर्व प्रायोजक,जाहिरातदार,देणगीदार, वर्गणीदार,हितचिंतक आणि पत्रकार यांचे मन:पूर्वक आभार.

आमच्यावर विश्वास ठेवून २०१७-१८ ह्या उत्सवांचे व्यवस्थापन करण्याची संधी दिल्याबद्दल माननीय संचालकांचे ऋणी आहोत.

धन्यवाद,


श्री. चंद्रकांत जोशी
अध्यक्ष, दुर्वांकुर मित्र मंड्ळ