```php

दुर्वांकुर मित्र मंडळ

दुर्वांकुर मित्र मंडळ - २०१७-१८ उत्सव व्यवस्थापक

वर्ष २०१७-१८ साठी व्यवस्थापन आमच्या दुर्वांकुर मंडळाला मिळाले याचा खूपच आनंद होता पण इतरही अनेक उत्साही मंडळी गणेशोत्सवात काम करायला उत्सुक होती.त्यामुळे या वर्षी प्रथमच एक अनोखा प्रयोग आम्ही केला.यापूर्वी सुभेदारवाडा गणेशोत्सवाचे व्यवस्थापन यशस्वी करणारे इतर मंडळाचे सभासद पण आम्हाला मिळत गेले. जुने दुर्वांकुर मंडळ ,अथर्व मित्र मंडळ, ओम चिंतामणी मंडळ, परशुराम मित्र मंडळ आणि महिलांचे रिद्धी-सिद्धी मंडळ अशा वेगवेगळ्या मंडळाचे सभासद एकत्र आले. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुरुष व महिला एकत्र येऊन काम करत होते. हे तर पहिल्यांदाच घडले.ही सरमिसळ जमेल की नाही अशी सुरुवातीला धाकधूक होती, पण सगळेच बाप्पाच्या गुळखोबऱ्यासारखे एकजीव होऊन काम करू लागले. वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या. प्रत्येकाचे काम सुरु झाले आणि हा हा म्हणता बाप्पाच्या आगमनाचा दिवस येऊन ठेपला.